सामर्थ्य
सामर्थ्य
प्रत्येकाची सत्ता हेच सामर्थ्य त्या
सांभाळून लागते ठेवावेच |
शक्य तितके दुर्बळांना सांभाळून
वरचढांना लागते ठेचावेच | | १| |
सामर्थ्य असता शब्दांचे होती
शस्र फुटती गवतांनाच भाले |
लेखणीच होता तलवार वीरश्री
संचारताच लढण्यास आले | |२| |
सामर्थ्य लष्कराचे देशासाठी
समर्पित असावे लागे एकनिष्ठ |
सामर्थ्य मैत्रिचे असावी अतूट
संबंध जिवाभावाचे नि घनिष्ठ | |३ |
राज्यकर्त्यांच्या सामर्थ्याचा जेथे
तेथे होत राही का बोलबाला |
चाले अनागोंदी कारभार नेत्यांचा
सामर्थ्य शब्दांतच झोल झाला | |४| |
