STORYMIRROR

UMA PATIL

Tragedy

3  

UMA PATIL

Tragedy

सामाजिक संघर्ष

सामाजिक संघर्ष

1 min
13.8K


जीव गुदमरतो माझा

होत नाही काम

कितीही कष्टलो तरी

मनाजोगता नाही दाम


लढतो मी रोज इथे

करतो समाजाशी संघर्ष

मनात कुढलो जरी मी

ओठी असतो सदा हर्ष


ती साळवेंची सून

हुंड्याच्या छळामुळे मेली

अशीच रडत - कुढत

कितीतरी वर्ष गेली


मोहित्यांच्या बाळूने म्हणे

कमीवयात लग्न केले

म्हातारपणात दोघांचेही

खूप हाल - हाल झाले


गर्दीशी झुंजता - झुंजता

गर्दी चिरडली पायांनी

चेंगराचेंगरी होऊन

पोरे गमावली मायांनी


सरकारी मोठा अधिकारी

टेबलाखालून घेतो लाच

मी दुबळा, गरीब, बिचारा

सोसतो समाजयंत्रणेचा जाच


मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर

गोळ्या घालतो कसाब

माणसे मारतो नाहक

याच जन्मी देतो हिसाब


सावंत वहिनींची छेड

त्या बाईकवाल्याने काढली

त्याला दिले पोलिसांकडे

अशी कितीतरी दुःखे वाढली


श्रीमंत माणूस देऊन ढेकर

पोटावरून फिरवतो हात

पण गरीबाने कशी करावी ?

या परिस्थितीवर मात


किती करावा सामाजिक संघर्ष

तरी जगतो हसत - रडत

जसा पक्षी इलेक्ट्रीक तारेवरून

कोसळला उडत - उडत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy