साक्ष
साक्ष
कशाला तुझ्या त्या मिजाजास पाहू.
हसूनी प्रितीच्या दुराव्यास पाहू.
तुझ्या काजळाच्या कडांनी भिजावे.
बसूनी सदूरीच हा ध्यास पाहू .
मजेने कलेजा चिरूनी तू जावे.
प्रितीला चिरूनी तिचा व्यास पाहू.
नदीला ठिकाणाच नाही कुठेही.
तुझ्या आवडीचा तिचा न्यास पाहू.
रहावे इथे की निघूनीच जाणे.
तुझा तो इशाराच आल्यास पाहू.

