STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

साकार करते स्वप्न बाबांचे

साकार करते स्वप्न बाबांचे

1 min
145

चिमुरडी जरी बेबी

तरी मोठी होईनच

स्वप्न साकार बाबांचे

भविष्यात करीनच     (1)


सीमेवर लढताना

का हो धारातीर्थी तुम्ही?

गणवेश सैनिकांचा

घालतसे हौसेने मी    (2)


बेटी माझी लई गुणी

भूदलात अधिकारी 

गाजवेल रणांगण

स्वप्नं बाळगली उरी    (3)


खूप खूप शिकूनिया

अधिकारी मी होईन

गणवेश घालूनिया

रणांगण गाजवेन     (4)


पराक्रमी वडिलांची

लेक मी रणरागिणी

नाव तुमचे उज्वल

कर्तृत्वाने रणांगणी    (5)


स्वप्न पित्याचे साकार

लेक करेल निश्चित

पराक्रमी लेक सांगे

बाबा रहा हो निश्चिंत    (6)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract