STORYMIRROR

Komal Patil

Drama Romance

2  

Komal Patil

Drama Romance

साजणी माझीच तू

साजणी माझीच तू

1 min
70

चंद्र, चांदण्या माळलेली

मज भासते तू यामिनी

कामिनी अन् रागिणी

साजणी माझीच तू


येते अशी प्रीतीत

मज भासते तू मंजिरी,

साजिरी अन् गोजिरी

साजणी माझीच तू


पाहतो, न्याहळतो मी

सारखा तुजला असा,

मोहिनी अन् मनोरमा

साजणी माझीच तू


झुकावली ही नयनेही

पाहून तुजला साजणी,

देखणी अन् रोहिणी

साजणी माझीच तू


लाजणे तुझे असे

वेड लावते वेगळे,

बावरी अन् लाजरी

साजणी माझीच तू


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Drama