साज निसर्गाचा
साज निसर्गाचा
सौंदर्य खुलले
निसर्गाचेही,
तन-मन किती
पुलकीत होई...
देखावा सुंदर
साज निसर्गाचा,
बेभान होऊनी
स्वानंद स्वर्गाचा....
हिरवा-हिरवा
नक्षीदार शालू,
लाल बुट्टी शोभे
किती-किती पाहू..
डोंगराची छाया
धुक्यात न्हाहली,
आकाशाला कशी
एकरूप झाली...
दृष्टीचे पारणे
दृश्याने फिटले,
सुख हिंदोळ्यात
चौफेर नटले...
