STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

2  

Sarika Jinturkar

Fantasy Others

साज हा रंगला..

साज हा रंगला..

1 min
36

खुळ्या- सावळ्या या नभाला

कळेना कुठूनही असा साज हा रंगला 


मेघ दाटले नभोमंडपी

 हळुवार जसा कापूस हा पिंजला  


 सप्तरंगी रंगाची झाली उधळण 

इंद्रधनुचा खेळ हा अवघा रंगला


वीज चमकली मेघराज गरजला 

अंगावरती पावसाचा 

पहिला थेंब अलगदपणे बरसला 


आल्या मग सरसर 

पावसाच्या सरी 

आनंदीत झाली सृष्टी सारी

आल्हादायक थंडगार 

 वारा बेभान होऊन सुटला 


रान हिरवे लाजले, 

लाजल्या रानवेली  

हिरवा शालू नेसुनी अवनी

 दवमय मोत्यांनी नटली 

आला पाऊस, गंध मातीचा सुटला

खुळ्या -सावळ्या नभाचा असा साज हा रंगला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy