साहित्याची वारी
साहित्याची वारी
साहित्याची वारी|पूजा सरस्वती
मिळे आम्हा मती| सर्वकाळ||१||
शारदा पूजन| घेऊन लेखणी
प्रतिभा देखणी| घडवूया||२||
सदैव वाचन|पडे ज्ञान भर|
सरस्वती वर| मिळे सदा||३||
जतन करूया|भांडार ज्ञानाचे
यश जीवनाचे|आम्हाला हो||४||
ग्रंथदिंडी काढू|जाऊ घरोघरी
साहित्याची वारी|पूजोनिया||५||
सकलजनांना| मिळे सारे ज्ञान
जगी मिळे मान| आयुष्यात||६||
मनाची भावना| लेखणीत व्यक्त
भाव होई मुक्त| साहित्यात||७||