सागरकिनारा
सागरकिनारा
चल सखे दोघे
सागरकिनारी जाऊ,
लोळू या वाळूत
पुन्हा तरुण होऊ
येऊ दे आपल्या
तारुण्याला भरती,
दोघे एक होऊ
सागरकिनाऱ्या वरती
डुंबून जाऊ दोघे
आज प्रेमसागरात,
सागरकिनारी हवा
माझ्या हाती तुझा हात
सागरकिनारी सारे
लैला मजनू असतील,
आनंदाला आपल्या
पारावार नसतील
सागरकिनारी जाऊ
पुन्हा तारुण्य पाहू,
कवेत तुला घ्यायला
आहेत माझे बाहू

