साडीतली सखी..... माझी
साडीतली सखी..... माझी
खिळतील नजरा तिच्यावरी कितीही,
जेव्हा ऐटीत ती, मोठ्या गाडीत बसते....
घातले कितीही जीन्स टॉप अथवा ड्रेस,
पण तरीही, ती साडीतच छान दिसते.....
भले गालावरील खळी तिची, खुप खाते भाव,
अन, साऱ्या सृष्टीला लाजवेल, इतकी ती छान हसते..
पावसात भिजुनी किती ही मादक दिसली जरी ,
पण तरीही, ती साडीत छान दिसते..

