साडेतीन शक्तीपीठ
साडेतीन शक्तीपीठ
साडेतीन शक्तीपीठ
आहे महाराष्ट्र देव
अभिमान श्रद्धा भक्ती
उद्धारती ह्या मानव
त्यात तुळजापूर हे
आहे पूर्ण पिठ जाना
मनोभावे घ्या दर्शन
आई तुळजा प्रार्थना
आहे माहूरि रेणुका
माता परशुरामाची
देवस्थान हे जागृत
सप्तशृंगी या भक्ताची
अर्धे पीठ हे नाशिक
जागरण होम करी
अष्टमीला होई शांती
जीवसृष्टी ही उद्धरी
