STORYMIRROR

Mrudula Raje

Inspirational

4  

Mrudula Raje

Inspirational

साद वसुंधरेची....

साद वसुंधरेची....

1 min
387

साद वसुंधरेची....


एकेकाळी पृथ्वीवरती वृक्षांचे घनदाट जंगल।

प्राणी - पक्षी विहरत होते, करती ' जंगल में मंगल '॥


दिवस बदलले, वृक्ष तोडले, इमारतींची आता जंगले।

अरण्यातले प्राणी - पक्षी भयभीत होऊन दूर पांगले ॥


सिमेंटच्या ह्या जंगलामध्ये कोठे पाणी, कोठे हिरवळ? ।

निसर्गाची साथ शोधती , त्यांस म्हणती इथे खेडवळ॥


आभाळाची नको निळाई, हवी कुणाला इथे हिरवाई?

उंच इमारती, भव्य फ्लॅटच्या मालकास का हवी वनराई? ॥


परंतु हे आभासी जीवन, कुठे घेऊन जाईल तुम्हां?।

एके दिवशी कराल तुम्हीही पाण्यासाठी पृथ्वी - परिक्रमा॥


पाणी जेव्हा नसेल भूवर, शास्त्रही शोधा घालील आवर।

हे विचारी मनुजा , तूच रे, वृक्ष वाचवून जीवन सावर॥


आधुनिकतेच्या नावाखाली , नको अंदाधुंद वृक्ष कत्तल।

तापेल जर ही वसुंधरा, कोपेल ती, अन् घडवेल अद्दल॥


तेव्हा नसेल हे जनजीवन, पाणी शोधीत फिरशील वणवण।

पशू - पक्षी शोधतील तुज मग,व्याकुळ होऊन करण्या भक्षण॥


माय आपली वसुंधरा ही, हिरवी झाडे तिची लेकरे।

वाचव त्यांना, वाचव जीवन, रक्षण करुनी सुखी राहा रे॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational