साद आपुलकीची
साद आपुलकीची
नकळत कसे जवळचेही
जाऊ लागले दूर दूर.
निघाल्या कळा काळजातून
अन् अश्रूंचा येऊ लागला पूर ..
खोटं होतं का ते प्रेम,
खोट्याच का त्या भावना..
कुणा आपुलकीची साद
आता कुठे कानी पडेना....
एकटा एकटा पडला जीव,
आयुष्यात काहीच नाही भरीव.
नाती गोती गेली सोडून
कोणालाच कशी आली नाही कीव...
सावली देणाऱ्यानीच कसं
ढकललं पोळणाऱ्या उन्हात.
प्रेम, माया आपुलकी मैत्री,
सारं सारं कसं तोललं पैशात..
मुखवटे घालून हिंडणारी ती,
नातीच सारी निघाली लंगडी,
सुखात सोडा दुःखातही नाहीत,
आज किशात नाही ना दमडी...
फाडून टाकली नात्यांची ती पानं..
जी फक्त पैशाला हपापलेली
कधी रक्ताच्या शाईने लिहू वाटलेली,
ती नात्यांची डायरी अपूर्णच राहिली..
