STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

रविवार संध्याकाळ...!

रविवार संध्याकाळ...!

1 min
931

रविवार संध्या

सुट्टीची मस्त मजेची


पण

कोठे कोठे एसी ची 

कोठे कोठे कुलर ची

कोठे कोठे पंख्याची

कोठे कोठे वर्तमान पत्राची

कोठे कोठे सावलीची

कोठे कोठे उन्हाची

कोठे कोठे काहिलीची

कोठे कोठे कासावीस करणारी

कोठे कोठे असमाधानी ठेवणारी

तर कोठे कोठे बेचैन करणारी


थोडक्यात

रविवारची संध्या सौख्य हरण करणारी

घराकडे धडपडत घेऊन जाणारी

हूर हूर लावणारी

अनामिक ओढ निर्माण करणारी


काहतरी विसरल्याचे सांगणारी

काहीतरी आठवण करणारी

काहीतरी सुचवणारी

काहीतरी बोचणी लावणारी

कोणती तरी टाचणी टोचणारी

काहीतरी खुपणारी


खिशाला चाट लावणारी

वेगळाच घाट घालणारी

वेगकाच थाट मांडणारी

वेगळाच सूर लावणारी

वेगळाच रंग दावणारी

वेगळाच रंग भरणारी


पण जस जसा

रविराजा क्षितिजावर कलतो

तसा तो साऱ्या त्रुटी भरून काढतो

एक एक करीत

वाऱ्याची झुळूक पाठवतो

घामेटल्या अंगावर फुंकर मारतो

थोडे बरे वाटते


वाटत सुख सुख म्हणजे दुसरं काय..?

त्याच्या तावडीतून सुटका...!

सार विसरायला होतं

आणि पुन्हा

आनंदाला भरती येते

हळूच हात जोडले जातात

आणि म्हणतात

रविराजा शुभ सायंकाळ

उगवू दे पुन्हा तुझी

रम्य सकाळ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational