रुसवा
रुसवा
बऱ्याच दिवसांचा रागाचा कढ
साठला होता माझ्या मनात
रुसायचे ठरवले सख्यावर
हिंमत एकवटली मी क्षणात
पहाटेला आला लाडात
.... . हातच मी झिडकारला
....... काय आहे माझ्या मनात
.. . क्षणभर तो बिथरला
लाडाने केली त्याने मस्काबाजी
डोळे पाहून ओळखली मर्जी
. दटावले सांगितले रुसले आहे
रागाने बोलले नको हांजी हांजी
बिचकून तो मागे सरकला
उद्या नेतो बोलला शॉपिंगला
मग हॉटेलला नि चौपाटीला
. . . हळूच चित्रपटाचेही बोलला
रुसवा गेला क्षणांत पळून
लाडीगोडीची पडली भूल
. . शिरले मिठीत होऊनि धुंद
कानात बोलला एप्रिल फूल

