STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

रुपे पाण्याची

रुपे पाण्याची

1 min
255

रंग बदली जादूसारखे

क्षणाक्षणाला पाणी

बेमालूम मिसळून जाई

जीवन महागुणी


प्रपातातूनी खळखळूनी

पाणी कोसळे झणी

आनंद तुषारांचे देई

पर्यटकांसी मनी


डोंगर नदी पार करुनी

वाहे प्रवाहातूनी

भेटण्यास प्रियासी

नदी तृप्त मीलनी


जनजीवन हो परिपूर्ण

जीवना तुझ्यामुळे

डोळे लावी नभी कृषीवल

पर्जन्य आशेमुळे


जलचरांचा तू त्राता दाता

तूच सर्वस्व तया

जळावीण तळमळे मासा

जीवन देसी तया


वृक्ष वेली नि लता तरुंना

बहर तूच देसी

घन घन मालांचे नर्तन

हरितसृष्टी होई


किती रुपे वर्णू तुझी नाना

कधी रौद्र वादळी

रिमझिमत्या धारांमधून

बरसावे जीवनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational