STORYMIRROR

jaya munde

Fantasy

3  

jaya munde

Fantasy

ऋतूराज

ऋतूराज

1 min
274

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  सहा ऋतूंचे सोहळे

  त्यांचे महत्त्व आगळे,

  शिशिराने गारठून

  सृष्टी नटली वेगळे.......


  आला वसंत हसत

  सृष्टी फुलून टाकण्या,

   ऋतूराज जादूगर

  कांडी जादूची फिरण्या..


  रम्य निसर्ग सजला

  साज चैतन्य फुलोरा,

  मनी उमेद उत्साह

  नाचे मनाचा पिसारा....


   शब्द अंतरी फुलले

   काव्य ओठांत स्फूरले,

   जादूगार आला पहा

   सृष्टी चैतन्य अर्पिले.....


   करी कोकिळ सर्वात

   बुलबुल मोहवीत,

   आविष्कार वसंताचा

    किती वाटे शोभिवंत.......

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy