रस्त्याचे महत्त्व
रस्त्याचे महत्त्व


देशाच्या अखंडतेला रस्त्याने जपले होते
लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत सुखरुप पोहोचवत होते
घेऊन जातो सर्वांना हा रस्ता अटळ आहे
थकल्यामुळे थकल्या पावलांना विसावा देत आहे
कितीतरी डोंगरांना एका बाजूने ओलांडतो तो रस्ता असतो
मुख्य मार्गाने शहरांना व गावांना जोडण्याचे काम करतो
रस्ता कधी सरळ होता तर कधी वळणावरचा घाट होता
गाडी चालताना हा रस्ता मागे सरसावत होता
असेल रस्ता सुंदर तर कोठे जातो विचारु शकता
पण ध्येय प्राप्तीसाठी रस्ता कसाही चालू शकता
आयुष्य एकाकी असलं
तरी अर्थपूर्ण असावे लागते
सोबतीला कुणीच नसलं तरी रस्त्यासोबत असावं लागते
अपयशाची वाट येते रस्ता चुकला असताना
यशाचा चौक लागतो विचार करुन वाट चालताना
वाटा बदलल्या तरी ओढ रस्त्याची संपत नाही
पावलं अडखडळी तरी चालणं काही थांबत नाही
गाव दूर आहे म्हणून तू रस्ता सोडू नकोस
स्वप्न मनात धरलेले तू कधी मोडू नकोस
कोरोना देशात आल्यामुळे रस्ते सुनसान झाले आहे
सारे सिग्नल सोडून लोकांचे आयुष्य धावत आहे
तरी आज देशातील रस्ते शांत आहेत
या निवांताचीच देशाला फार खंत आहे...