रोपटं
रोपटं
जसा पेटलेला वणवा हळू हळू वीझत होता,
अलगद असा हा गारवा जाणवत होता.
कोरड्या जमिनीत रोपटं तग धरू बघतय,
अलगद डोक ऊंचाउन उन्हाची चाहूल घेतय.
गालातल्या गालात हसत बाजूला बघतय,
मुसळधार अश्या पावसात न्हाऊन जातय.
ताकद कमी पण जिद्दी वर जगतय,
बळीराजाला हसताना एकटच बघतय.
आई धरणी मालक बाप वाऱ्याला झोम्बतय,
ईवलूस रोपटं बघा उद्या आभाळ पांघरतय.
