रोमँटिक खाऊ
रोमँटिक खाऊ
मी माझ्या स्वप्नांना
न्हाऊ घालतोय
पौष्टिक आणि रोमँटिक
खाऊ घालतोय || 0 ||
विचाराची वाढ अशी
मस्त व्हावी
किंमत ही खाऊची
स्वस्त व्हावी
होलसेल मध्ये खाऊ
आगाऊ देतोय || 1 ||
भुकेनं तळमळ
होऊ नए
माझी चूक त्यांना
भोवू नए
सप्लिमेंटमध्ये त्यांना
मावू देतोय || 2 ||

