रंगपंचमी
रंगपंचमी
जीवन हे रंगीन
त्यात बहू रंग
रंगपंचमी त्यात
भरते नवी उमंग
गोड हसऱ्या गालावर
रंग छटा येते
मनात असलेली उदासी
रंग उरातून नेते
देहभान हरपून
मन रंगीत होतं
जीवनाच्या फेऱ्याचं
नव्यानं फिरतं जातं
सदाबहार निसर्गात
मन हसरं होतं
थकलेल्या मनाची मळभ
हा रंगोत्सव नेतं
जीवनाच्या वाटेवर
वाट नवी फुलते
दुख गारा सारखं विरुन
आनंद तिथं झुलते
रंगपंचमी रंगाना घेऊन
जीवन प्रफुल्लित करते
ही नवी पहाट
पुन्हा जगणं शिकविते