STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

कोरोना-गीत

कोरोना-गीत

1 min
797

लई झाले थैमान कोरोनाचे,

लई अती झाले या विषाणूचे 

आता या कोरोनाच्या नाशाला 

सर्व मिळून एक होऊ

लढा आपण सारे देऊ 

कोरोनाग्रस्तांना जीवदान देऊ 


केला विनाश मानवाचा,

व्हायरस पसरला जगभर 

सापडले सारे जग मरणाच्या खाईत

या कोरोनाच्या भयंकर विळख्यात 


धडाधड मृत्यूचे तांडव,

सडे पडले धरतीवर 

साऱ्या जगाला सतावले 

साऱ्या मानवाला रडवले 

आता नाही याला रे सोडायचे 

कायमचे पळवून लावायचे 


लावा शिस्त स्वत:ची स्वत:ला 

अनमोल जीव वाचविण्याला 

सुख, शांतीने जगायचे,

सारे मतभेद विसरायचे 

मदत करा सारे जन 

होवू द्या सर्वांचे एकत्र मन 


आधार द्या रे गरिबांना 

आधार द्या रे कोरोनाग्रस्तांना 

कोरोनाची दहशत संपवू 

आपणच मानव सारे,

पुन्हा विजयी होवू 

कोरोनाला आपण हरवू 

कोरोना विरुद्धचे युद्ध 

आपणच मानव जिंकू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational