Candy SM

Inspirational


3  

Candy SM

Inspirational


बाप

बाप

1 min 656 1 min 656

मनात सारं काही साठवणारा

उद्याच्या जेवणाची चिंता करणारा

प्रसंगी वज्रासम कठोर असणारा

 

संकटात पाठीवर अबोलपणे हात ठेवणारा 

दुःखात खचून न जाता खंबीर उभा राहणारा

रिकामा खिसा असून लाड पुरवणारा


मुलांना शिस्तीचे धडे देणारा

कुटुंबासाठी झटताना स्वतःला विसरणारा

जीवनाचा खरा अर्थ शिकवणारा


जन्मभर कठोर वाटणारा

मात्र लेकीला निरोप देताना हळवा होणारा

आपली परी काळजावर दगड ठेऊन दुसऱ्याला सोपावणारा

मुलांच्या सुखासाठी सदैव हरणारा


असा तो एक बाप असतो.....


Rate this content
Log in

More marathi poem from Candy SM

Similar marathi poem from Inspirational