STORYMIRROR

Candy SM

Others

3  

Candy SM

Others

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
518

भावनांचे अविरत जाणारे हे बंध कसे सोडवावे

भिडता नयन दोघांचे कसे चुकवावे


दुनिया ही पाषाणाची मैत्रीसही दुषणे देते

पाण्यासम निखळ मैत्रीही मग मातीमोल होते


त्या मातीतही तुझ्या आयुष्याचा अंकुर फुलावा

गगनी भिडलेला वृक्ष असला तरी अंतरी मात्र मैत्रीचा ओलावा


आपल्या मैत्रीची याद अप्रत्यक्षपणे राहील सदा जीवनी

अदृश्य-अबोल जरी मी तरी हे ऋणानुबंध अखंड जपेन मनी


Rate this content
Log in