गुंतता हृदय हे
गुंतता हृदय हे
1 min
592
भेट तुझी वेड लावी जीवा,
वैशाखातही मग दाटून येई गारवा...
कवेत तुझ्या जग माझे वसे,
गुरफटून जीव माझा त्यातच फसे...
गुंतता ओठ-ओठात गुलकंद जणू भासे,
शहारून येई सर्वांग मनी हर्ष दाटे...
धगधगते उसासे मिटवता ही दूरी,
श्वासही-श्वासास देती मंजुरी...
विसावता मम तव बाहुपाशात,
नको ना सोडून जाऊस या मुक्या कळीस...