Sakharam Aachrekar

Inspirational


5.0  

Sakharam Aachrekar

Inspirational


अगणित तव उपकार माते....

अगणित तव उपकार माते....

1 min 738 1 min 738

तुझ्याविना हा रथ आयुष्याचा, कसा करू मी पार

अगणित तव उपकार माते, अगणित तव उपकार


वाढवलेस मज जन्मापूर्वी, नवमास तुझ्या उदरी

दिधलेस नंतर बाळकडू बोधवून, संस्कार नानापरी

शिकवण मजला प्रेमाची गवसली, तुझ्याच हृदयमंदिरी

अथांग पसरलेल्या तुझ्या मनाच्या, मायेच्या सागरी

घेईन जन्म पुन्हा तुझ्याच पोटी करण्या, तुझी स्वप्नं साकार

अगणित तव उपकार माते, अगणित तव उपकार


केलेस साक्षर मजला दाखवून, एकेक तू अक्षर

बालमनातून माझ्या घडवलास भविष्यातला पुष्कर

टाकले पाऊल पहिले भुमीवर घेऊन, तुझाच हाती कर

लिहून ओळी दोन परी, करेन तुजला माते अमर

गुरूमाऊली तूच माझी, तूच माझा आधार

अगणित तव उपकार माते, अगणित तव उपकार


अनंत चुकांना केलेस क्षम्य असा, दयेचा तू सागर

दिधलीस दिशा मज जगण्याची, देउन वीरांचे विचार

दाऊनी वाट नित्य सत्याची, केलास दूर असत्याचा अंधार

देऊन दाखले पांडवांपरी, दिलास मम जीवना आकार

अगणित तव उपकार माते, अगणित तव उपकार 


Rate this content
Log in

More marathi poem from Sakharam Aachrekar

Similar marathi poem from Inspirational