STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

रंगबहार

रंगबहार

1 min
32

नील नभाची निळाई

प्रतिबिंब सरोवरी

काय बघू उमजेना

सरोवरी की अंबरी?


लाटा उठती सागरी

रत्नाकर आतुरसा

पौर्णिमेचे पीत बिंब

 मीलनास अधीरसा


रवि उगवे क्षितीजी

प्रभा उजळे सोनेरी 

उंच शिखरी कांचन

लखलखताना वरी


लाल रक्तिमा लाजेचा

प्रेयसीच्या मुखावरी

लाल रंगी कुमकुम

शोभे तिच्या भाळावरी


शालू हरित धरेचा

वर्षा ऋतू खुलवितो

फुले विविध रंगाची

वसुधेस नटवितो


शांत नील जलाशय

प्रतिबिंब गगनाचे

मंद हळुवार लाटा

फिटे पारणे डोळ्यांचे


केली रंग पखरण

निसर्गाने धरेवरी

रंगमय जीवनासी

भुले मानव अंतरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract