रंगात रंगूया सारे
रंगात रंगूया सारे
सख्या केलास अट्टाहास पाहा ना रे
दंग होऊ होळीच्या रंगात रंगूया सारे
प्रीत जडली तुजवरी झाली नयनभेट
आसुसले तव मिलनासाठी भेट ना रे
ओळखीची खूण पटली हरखले मन
उठलेय काहूर हृदयात शहारले तन
लागली ओढ मला भेटीची ये ना रे
स्वप्नातही पाहते तुला सख्या हर क्षण
प्रीतीच्या खेळात सख्या तू हरवलास
हृदयाच्या कप्प्यातच बंद तू झालास
खळखळते हास्य तुझे गुंजते कानात
सावरता या वेड्या मनाला तू हसलास
क्षण भेटीचे सख्या ठेव जपून अंतरात
ओथंबून भावना दाटल्या माझ्या उरांत
नको रुसवा राग अबोला ये भेटण्यास
हसू खेळू गाऊ प्रीतीचं गान एका सुरात

