STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

रंगात रंगला श्रीरंग

रंगात रंगला श्रीरंग

1 min
255

होळीचा खेळायचा रंग 

गोप गोपी झाले दंग 


कृष्णाने वाजविला पावा 

पेंद्या रंग खेळायला चल भावा 


आणला मुठीत रंग लाल 

गोपिकांचे रंगले गाल 


विठ्ठल उभा कटीवर हात ठेवून

रुक्मिणी काळा रंग आली घेऊन 


नखशिखांत झाला काळा 

तिला दिसू लागला मनी घनःश्याम निळा 


व्यापले निळ्या रंगाने नभ 

गुलाबी पहाट झाली बघ 


आले दत्तगुरू बघावयास रंगांची होळी 

होती भरलेली केशरी रंगाने झोळी 


सृष्टीने पांघरला शालू हिरवा पांढरे कद लेऊन,

एकतारी घेऊन नारद वाजवू लागला मारवा 


राग ऐकुनी धुंदी चढली 

सगळ्याच रंगांची चादर देवांनी ओढली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational