रंगांची उधळणणा
रंगांची उधळणणा
मानवाचे मन आहे
रंगाची भरगच्च पेटी,
कधी कुठला उधळेल
थांग न लागे शेवटी .
होलिकोत्सव सण आहे
तात्पुरत्या रंगांची उधळण,
प्रेमाचा हा रंग गहिरा
भक्ती रसात आकंठ गवळण.
निसर्गातील सौंदर्यमयी
रंगाचे प्रतिक इंद्रधनुष्य,
प्रत्येक रंग देतो संदेश
रंगीबेरंगी असावे आयुष्य .
कधी प्रेमरुपी रंग
कधी करी दुःख बेरंग,
मनमोराचे बेधुंद रंग
तर कधी उमटे सूर तरंग.
प्रत्येक रंगाची असते
किमया ही भरजरी,
हळूच वेचून घ्यावी
रंगाची नजाकत भारी.
रंगात रंगूनी रंगमयी
रंगीन जीवन जगावे,
रंगीबेरंगी जीवन जगतांना
सृष्टी तरंगात हळूच उरावे.
