फक्त तुझी साथ हवी
फक्त तुझी साथ हवी
आयुष्याच्या वळणांवरती
कित्येक अडथळे वाट अडवी,
करील धैर्याने मात त्यावरी
मला फक्त तुझी साथ हवी ||1||
येऊ दे संकटे कितीही
रोजच्या जीवनात उभी आडवी,
तोंड देण्या नाही भिणार
मला फक्त तुझी साथ हवी ||2||
प्रत्येक सुख-दुःखात खंबीर
झटकून सारे मनास उठवी,
नाही हतबल मी होणार
मला फक्त तुझी साथ हवी ||3||
हळव्या त्या सुखद क्षणी
प्रोत्साहन देण्या तू टाळी वाजवी,
माझ्या वाढवण्या मनोबलासाठी
मला फक्त तुझी साथ हवी ||4||
घेईन मी भरभरुन श्वास
रोज झिजुनही उरेन नवी,
प्रेमळ तुझ्या स्पर्शाने बहरण्या
मला फक्त तुझी साथ हवी ||5||

