सावधान भ्याडांंनो
सावधान भ्याडांंनो
ओळखच जगी भ्याड
अपेक्षाच नसे दूजी
वार पाठीमागून हे
धारातीर्थी पडे फौजी
उडवूनी चिंध्या चिंध्या
पायंदळी माणुसकी
हल्ला होतो हा भ्याडांचा
वाटे त्यात मर्दूमकी
अरे आहे जर धैर्य
करा वार समोरून
मरणही घाबरेल
शौर्य सेनेचे पाहून
दूध मेलेल्या आईचे
तुम्ही आहात पिणारे
फौज पाहताच हिंद
अंगी शत्रूच्या शहारे
उडवूनी लेक,पिता,
पती झाला तुम्हा हर्ष
एक वार आरपार
सावराया लागे वर्ष
सावधान राहा आता
कधी,कुठे,कसा,केव्हा
साधू आता आम्ही डाव
मग खाऊ घास तेव्हा
व्यर्थ नाही जाणार हे
बलिदान जवानांचे
पुलवाडा भ्याड हल्ला
चित्र आतंकवादाचे
