तिरस्कार
तिरस्कार
तिरस्कार कशाचा....
बुज-या वागण्याचा की सुंदर दिसण्याचा..
गो-या कातडीचा की घाण नजरांचा..
कर ना! प्रयत्न मला समजावण्याचा ..
तिरस्कार कशाचा...
स्त्री बनून जन्माला येण्याचा..
की पूर्वापार उपभोग्य वस्तू असण्याचा..
पुरुषी वासनांध विकृतीचा...
की स्त्री सुलभ अवयवांचा..
कर ना !प्रयत्न मला समजावण्याचा..
तिरस्कार कशाचा..
स्त्री जातीबद्दल घृणास्पद विचारांचा..
की प्रत्येक पुरुषातील लपलेल्या लांडग्यांचा..
स्वतःच्या वंश वाढीसाठी स्त्री वापराचा..
की लालवस्तीत बसवलेल्या वारांगणांचा..
कर ना ! प्रयत्न मला समजावण्याचा..
तिरस्कार कशाचा...
दरमाह येणाऱ्या लाल प्रवाहाचा..
की स्त्री निर्मात्या त्या परमेश्वराचा..
कर ना ! प्रयत्न मला समजावण्याचा..
तिरस्कार कशाचा...
मी करु तिरस्कार कशाकशाचा..?
