STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

रंगांची उधळण

रंगांची उधळण

1 min
244

लाल हिरव्या पिवळ्या रंगांची सजली रांग

शंकराने हट्ट केला खेळणार होळी पिणार भांग 

लटक्या रागात पार्वती म्हणाली नको भांग खेळायचा फक्त रंग, तसे असेल तरच मला सांग 

गणुबाप्पा म्हणाले पुरणपोळी खाऊन पोट झाले तट्ट रिद्धी सिद्धीला रंग खेळायचा करु लागले हट्ट 

आणले त्यांना हात धरून रंग आणला मुठ भरून 

गाली रंग फासलाखळखळून गणपतिबाप्पा हसला 

बघत होता विठू सावळा उभा विटेवर रंग खेळण्या रुक्मिणीने खोचला पदर 

काळ्या रंगाने पुर्ण माखला विठू, झाला काळा मनी दिसु लागला तो घनश्याम निळा 

कृष्णाने ओंजळीत आणला गुलाल गोपिकांना रंग लावून केले बेहाल 

राधा बसली कोपर्‍यात रुसून कटाक्ष टाकला तिच्याकडे हसून 

नजरेचा तो प्रेमकटाक्ष, नव्हता रंग काही दोघांमध्ये झाली सप्तरंगांची उधळण आपोआप बाई ॥ 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract