रंग पंचमी
रंग पंचमी
पळस फुलं,आणून छान
भरलिया पिचकारी
रंगाची $ $ रंगाची
केलीया उधळण।।धृ।।
दिस हेवं छान, रंगाचा मान
रंगात रंगली होळी
रंगली $ $ रंगली
लहान थोरांची गालं।।१।।
पुरण पोळी,सारं येसवारं
शिव्या शापांची,देवान घेवान
होळीची $ $ होळीची
खेळुया धुरवड।।२।।
दुधात भांग, भांगेत दंग
वेळू ती ,भरलीया पिचकारी
गुलाबी $ $ गुलाबी
धार उडे दुरवरं ।।३।।
नणंद देरं ,देर भावजय
नातं असं हे,गोड थट्टेच
रंगती $ $ संगती
चिखलफेक धुमशान।।४।।
निसर्ग देतो,निसर्ग घेतो
आनंद हा विभागुनी
आनंदी $ $ आनंदी
खेळले अवघे जन।।५।।