रंग लाल
रंग लाल
लाल रंगात रंगुनी
तुझ्या प्रेमात दंगले मी
तू नजरेने खुणावता
तुझ्या रुपाने झिंगले मी॥१॥
गालावरती फिरता
तुझा नकळत हात
हरवले मी सख्या
जादू तुझ्या स्पर्शात॥२॥
वाजवी बासरी कान्हा
झाले मी बावरी
तुझ्या उत्कट प्रेमाला
कशी विसरुरे श्रीहरी॥३॥