STORYMIRROR

प्रदीप माने

Inspirational

4  

प्रदीप माने

Inspirational

रंग आणि धर्म

रंग आणि धर्म

1 min
448

आता असाही एक धर्म असला पाहिजे,

जिथे माणूस, माणूस म्हणून जगला पाहिजे.


भाकरीत काबा अन रोटीत काशी,

उपाशी माणसातसुद्धा देव दिसला पाहिजे.


हिरव्या ,निळ्या,भगव्या रंगांनी आता,

रंग म्हणून धर्माबाहेर ठसा उमटवला पाहिजे.


गंगाही पेटलेली अन आग झेलमच्याही उरी,

शमवण्यास हिमालय आता वितळला पाहिजे.


तुझा दिवा वेगळा, माझाही वेगळा दिवा,

उजेड मात्र एकच सर्वत्र पसरला पाहिजे.


ज्याचा परिमळ पसरावा शेजारच्याही घरी,

असा मोगरा माझ्या दारी लावला पाहिजे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational