रम्य ते बालपण
रम्य ते बालपण
आज अचानक त्या
जुन्या आठवणींना
डोळ्यासमोर आणलं
माझ हरवलेलं बालपण
तिजोरीत असलेल्या जुन्या फोटोवरून
अजून एकदा अनुभवून पाहिलं
बालपण होते किती छान,
मित्र मैत्रिणी होते जीव की प्राण
आठवून बालपण अगदी प्रसन्न झाले मन, पुन्हा एकदा
जगावं बालपण वाटल मनाला काही क्षण
आपण किती मजा केली किती धमाल गोष्टी केल्या हे बघून थोडं हसायला आलं..
राग, तिरस्कार तर दूरची गोष्ट, मन हे आनंदाने बहरून आलं..☺️
आज पुन्हा एकदा लहान व्हावं असं वाटतं, मोठं होवून काय कमावले आणि काय गमावले,
बालपणात जावून पुन्हा शोधावसं वाटलं
ना थांबणार, ना ही संपणार ते बालपण
वयाने कितीही वाढत गेलो तरी
मनातून नाचणारं तुमचं आणि माझं
जीवनात सगळ्यात जास्त आनंद देणारं
सुंदर, रम्य ते बालपण🙏😊
