रक्त सळसळत
रक्त सळसळत
गुदमरल्या श्वासाने आज माझी मायभूमी विव्हळते
आठव पुत्रा तुझ्यामध्ये ही रक्त आहे सळसळते.....
तरुणांचा देश ऐसा मागास कैसा
पोकळ गप्पा नसे जवळ फुटका पैसा
लाचार युवाना पाहून अंतःकरण कळवळते...
स्वप्नात जगण्याची हौस भारी
बापाच्या जीवावर मौज सारी
भ्रमित युवकातील कल्पकता गुदमरते.....
स्वतःकडून नसते कशाची अपेक्षा
सदैव स्वीकारे इतरांची उपेक्षा
तरुणाई देखील अंतर्मनात तडफडते....
नसे अभिमान माता पित्याचा
तीरस्कार मनी आप्त स्वकीयांचा
तिरस्कारी पुत्र पाहून मातृत्व विषन्नते.....
भिकारडे विचार त्यागून दे
कर्तुत्वाला जागवून दे
खडे बोल मग 'प्रदीप्त' चे झनझनते...
आठव पुत्रा तुझ्यामध्ये ही रक्त आहे सळसळते....
