हिशोबाचं "प्रेमपत्र"
हिशोबाचं "प्रेमपत्र"
कधीतरी जिंदगीकडे ही कृतज्ञतेने बघायला हवं
हिशोबाचं "प्रेमपत्र" जरा जवळून वाचायला हवं...
कैक संकटाचा निधड्या छातीने सामना केलाय,
वार नियतीचा बघ माझ्या तन मनाने झेललाय,
आयुष्यानं दिलेल्या जखमाना
"स्माईलच्या" मलमानं भरायला हवं...
सुखाच्या नौकेत बनून भवसागाराचा प्रवास केलाय,
मोहजालातून निसटण्याचा सफल प्रयत्न केलाय,
यशाच्या सुरेल क्षणांना
"आनंदाश्रुनीं" आद्र करायला हवं...
तिरस्कार करणाऱ्या शत्रूनाही मैत्रीचा धडा दिलाय,
आप्त बनून खंजीर भोकणाऱ्यांचा रिता पपघडा केलाय,
इर्षेने पेटलेल्या वनव्याला
"प्रेमजलाने" शांत करायला हवं...
कधी मृगजलाव्रत स्वप्नांचा पाठलाग केलाय,
तर कधी निर्दयी पराभवाचा हसून स्वीकार केलाय,
त्याग भोग संभ्रमाचं गणित
"पश्चातापाने" सोडवायला हवं...
