स्वतःस मारत गेलो...
स्वतःस मारत गेलो...
नाग विषारी जाणीव असता पोसत गेलो,
घाव दुधारी राखीव नसता सोसत गेलो...
पाय जमिनी फसता आणखी रोवत गेलो,
हाय गरिबी बघता पोरकी कोसत गेलो...
दुःख नशिबी मिळता निव्वळ हासत गेलो
काया फरेबी चंदना सारखी घासत गेलो...
व्यर्थ लव्हाळे माथ्यावरती खोसत गेलो,
घाय जिव्हारी कळता मन मी मारत गेलो...
भाग्य कधीही छळता विनम्र वागत गेलो,
साय दुधाची मिळता गाय मी टाळत गेलो...
'अर्थ' हीन जखमेवर फुंकर घालत गेलो
हाय नव्याने जगता स्वतःस मारत गेलो...
