रक्षाबंधन
रक्षाबंधन
राखी प्रतीक रक्षणाचे
केवळ नसे हा धागा,
अतूट प्रेम अंतरीचे,
आळवी विश्वासाच्या रागा !!
वृत्ती निस्वार्थी सेवाभावाची
धनाची तिज नसे लालसा,
मायेच्या हळव्या क्षणांतील ,
ऊबेची सदा तिज मनिषा !!
अतूट नातं राही सर्वदा,
काळ कितीही बदलला,
बहीणभावाच्या नात्याला,
आशीर्वच सदा लाभला!!
