रिमझिम धारा
रिमझिम धारा
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा
कडकडणाऱ्या विजा आणि लख्ख प्रकाश सारा
आठवती पावसातील रिमझिम धारा
पावसाच्या मंजुळ आवाजाचा ध्वनी
सप्तरंगी धनुष्याचा च्या प्रेमाची कहाणी
रूप पालटून येणाऱ्या झिलमिल तारा
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा
विजांच्या कडकडाटाचा धाक तो मणी
म्हणावी वाटती बहिणाईची गाणी
असावे वाटते सोबतीला कोणी
घडावी इथेच प्रेम कहानी
झिलमिल झिलमिल संत तो वारा
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा
सगळीकडे पसरे श्रावणातील हिरवळ
पानावरती पसरे दवबिंदूची दरवळ
कधीच संपू नये वाटणारी कनवळ
जाणवे मनाला पावसाची धावपळ
झेलल्या होत्या या अनुभवांच्या तारा
मी पाहिलेल्या रिमझिम धारा
हळूच आवाज करत हलणारी पाने
गातात वाटे जसे पावसाचे गाणे
मोरही पंख पसरून फुलवी पिसारा
मी पाहिलेल्या रिमझिम धारा

