STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract

3  

Kanchan Thorat

Abstract

रेसिपी

रेसिपी

1 min
246

रेसिपी उद्या लवकर उठायचंय ....

काही सुखाच्या क्षणांना वाळवू म्हणतेय , 

काही मीठ लावून , तर काही ;

साखरेच्या पाकात घालायचे ; ठरवलंय . 

किती ऊन्हं ' यायची ? 

अजून काही महिती नाहिये . 

करायचं अंदाजाने ; 

बाकीचे पदार्थ करतेच की . 

हे ही उत्तमच होणार .... ! 

नाहीतर , 

हे सुखाचे क्षण परत आणायचे कुठून ?

आणि मिळालेच नाहीत , कधी कुठे तर ? 

नको ... ते पुढंचं पुढे बघु ! 

आणि हो 

काही सुखाच्या क्षणांचं लोणचंसुद्धा घालायचंय , 

आहे कोणाकडे रेसिपी .... ? 

म्हणजे नंतरही कधी चाखता येईल , सुखाची चव , 

तळून , भाजून ; नाहीतर तोंडी लावून . अरे 

एवढं सारं करायचं ठरवलंय .... पण .... 

माझ्याकडे आहेत का सुखाचे तेवढे क्षण ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract