STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

4  

Gangadhar joshi

Abstract

रात्रंदिन

रात्रंदिन

1 min
315

नक्षत्र चांदण l हाती धरून

करते नंदनवन l रात्रंदिन


पायी पैंजण l करी रुणझुण

फेडीते ऋण l रात्रंदिन


हळद कुंकू l सौभाग्य वाण

लावते भाळी l रात्रंदिन


नारळ खण l साडी कंकण

भरलेली ओटी l रात्रंदिन


चन्द्र चांदण l माहेरचं आंदण

काढत रांगोळी l रात्रंदिन


प्रपंच कांचन l अर्पिले तनमन

झिजले चंदन l रात्रंदिन


तुळस अंगणी l नटली छान

ठेवुनी भान l रात्रंदिन


सख्याचे जीवन lमाझे पंचप्राण

ठेवीन गहाण l रात्रंदिन


शरीरे त्राण l तोवरी राबीन

क्षण औक्षण l रात्रंदिन


रेशीम बंधन l करून तोरण

बांधीन चौकटी l रात्रंदिन


दैवाचे वरदान l श्रुष्टी सृजन

जीवन महान l रात्रंदिन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract