रातराणी
रातराणी
तिचा ओठ चंदनाचा, पसरला सुगंध सारा
वारा गादला यौवनाने, मोहरला आसमंत सारा
तरानेही मुकं झाले, कंठ मैनेचा गोठला
भुंग्याच्या गुंजनाने, जागला गाव सारा
गारवाही दाह झाला, श्वासातल्या मोहनाने
उतावीळ झुळूक झाली, सांभाळतांना तोल सारा
इंद्रधनूला खजिल वाटे, न्याहळतांना रुप तिचे
मेघांनी गर्दी केली, भिजवतांना वसंत सारा
धबधबाही विसावला, न्यारीच पाहता जलपरी
अवाक् फेसं सांडला, चोळीत तिचे अंग सारा
मोर पिसाला मोह सुटला, हळवा झाला स्पर्शास तिच्या
गुलाबही बावरला, चाटला तिचा गाल सारा
चंद्र झोपला पापण्यांवर, लाजला शुक्रतारा
गालावरची छाप पाहण्या, पिसाळला गाव सारा
