रात्र
रात्र
केवडयाच्या सुगंधानी
काया माझी मोहरली
प्रेमाच्या धुंद नशेनी
रात्रही बघ सखे बहरली
चांदण्यांच्या मंद प्रकाशात
संथ वाहणारया तळयाकाठी
रात्रीला या साक्षी मानून
वाट पाहते मी बावरी
कुठे राहिला साजण माझा
ही रात्र ना अशीच सरावी
कुणी कळवेल का तयाला
तुजसाठी प्रिया तुझी व्याकूळली.......

