STORYMIRROR

Rutuja kulkarni

Drama Romance Classics

2  

Rutuja kulkarni

Drama Romance Classics

रात्र वेडावणारी

रात्र वेडावणारी

1 min
20

अगदी मगाशीपर्यंत मंद भासणारी ती वार्‍याची झुळूक

आता चांगलीच शहारे आणतेयं अंगावर 


हळू हळू शहर रात्रीच्या कुशीत विसावते आहे आणि 

ही रात्र जसजशी पुढे सरकत आहे तसा


तो आसमंतात असलेला गारवा अधिक चं वाढतोयं

आणि हा गारवा मात्र हसतोयं


खिडकीच्या पडद्याशी न जाणे कोणता खेळ

सुरू आहे या गारव्याचा?


आणि दुसरीकडे तो चंद्र 

हळूच डोकावून पाहतोय माझ्याकडे


आराम खुर्चीमध्ये स्वतःभोवती

चादर गुंडाळून बसलेली मी मात्र गुंग आहे आज 


रेडिओवर चालू असणाऱ्या 

त्या ९० च्या दशकातील एक गाणे ऐकण्यात


एरवी त्या चंद्राची रोज खिडकीतून वाट पाहणारी मी आज मात्र तो माझ्याकडे पाहतोयं

माझे लक्ष नाही गेले त्याच्याकडे तरीही


किती गुंतलयं ना हे मन माझं त्या गाण्यांमध्ये आणि त्या गाण्याच्या प्रत्येक शब्दांमध्ये

असं वाटतयं की ही रात्र इथेचं थांबावी कायमस्वरूपी


आणि माझ्या रेंगाळलेल्या मनाला मी असचं कुरवाळत बसावं काही क्षण इथेचं

कारण रात्र रोज भेटत असली तरीही 

अशी एखादीच रात्र असते वेडावणारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama