कशी असेल ती
कशी असेल ती
चंद्राला लाज वाटावी
असावी इतकी सुंदर
लागावे मला तीचे
ग्रहण मी फिरावं
तिच्या सभोवताली
कोकीळे वाणी तो
गोड मधूर आवाज
दिसायला हवी ती
स्वर्गातील परी
सूर्याच्या किरणासारखी
चमकणारी काळीभोर केस
करावे येडे मला तिच्या
त्या मादक डोळ्याने
हरवून ताण भाण
उगीच वाट पहावी
वेड्या सारखं प्रेम
करनारी नसावी
थोडच पण खर
करनारी असावी
शहाणी नसेल ती
पण हूशार असावी
विचारात विचार
जूळवणारी असावी
जगाला न जाणणारी
मला ओळखणारी असावी
कशी पण असावी
फक्त माझी असावी

