कोणाच काय
कोणाच काय
जगण्यासाठी मर मर करावी लागत आहे
मरायचे दिवस आलेत जवळ
अनं लोक जगण्याची अपेक्षा करतात
कायम स्वरूपी या जगात काहीच नाही
मग ते वेळ असो की काळ असो या
जीवनात असलेला अंधकार
माणसं तुटतात जिभेच्या तेज धारेनं
पडीत झालीत माणुसकी ची रानं
वाढलीत बेईमानी ची वनं
माणसं झालीत बहीरी भिंतीला आलेत कान
कटांळा येतोय ऐकून याच त्याच रडगाणं
थाटमाट करताय पण आनंदात
साजरा होतोय का सण वार.?
माय बापाची झाली हाडाची काड
पोरगां नाचतोय बायको पुढं
निवडून दिलय येड शहाण्या
जनतेला खाऊ घालतय शेण
अच्छे दिन आएंगे हे चाँकलेट
अजून पण आहे त्यांच्या तोंडात
आपसात बसा भांडत ते
भरतात स्वतःची तळघर
